कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा सर्वात जास्त प्रभाव असलेल्या देशांतून तसंच युएई मधून  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या सर्व हवाई प्रवाशांसाठी ‘रॅपिड आर टी सीआर टेस्ट’ चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. या चाचणीमध्ये बाधित आढळलेल्या प्रवाशाला  मुंबईतल्या शासनानं ठरवलेल्या रुग्णालयात दाखल होणं बंधनकारक असणार आहे. तर चाचणी निगेटिव्ह आलेल्या प्रवाशाला ‘होम कॉरोटाइन’ रहावं लागेल, असं मुंबई महानगर पालिकेनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. कोविडसह ओमायक्रॉन विषाणूचा फैलाव वेगानं होत असल्याच्या पार्शवभूमीवर  खबरदारीचे उपाय म्हणून हे नियम लागू केल्याचं पत्रकात नमूद केलं आहे.