मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या वाढवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब

 

मुंबई (वृत्तसंस्था) : लोकसंख्या वाढीच्या प्रमाणानुसार मुंबई महानगरपालिकेतल्या नगरसेवकांची संख्या ९ ने वाढवण्याच्या राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं योग्य ठरवला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतली नगरसेवकांची संख्या २२७ वरुन २३६ होणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध भाजपाच्या नगरसेवकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली. १० वर्षांपूर्वी म्हणजेच २०११ सालच्या जनगणनेचा आधार घेत मुंबई महानगरपालिकेतल्या नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता.