चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ८ पूर्णांक ३ दशांश टक्के राहण्याचा जागतिक बँकेचा अंदाज

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ८ पूर्णांक ३ दशांश टक्के अपेक्षित असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. पुढच्या आर्थिक वर्षात भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या वाढीचा दर ८ पूर्णांक ७ दशांश राहील असं जागतिक बँकेच्या ताज्या जागतिक आर्थिक अहवालात म्हंटल आहे. पायाभूत सुविधांमध्ये खाजगी क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे त्याचबरोबर आर्थिक सुधारणांचे लाभही दिसू लागले आहेत. त्यामुळे जागतिक आर्थिक वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात ४ पूर्णांक १ दशांश टक्क्यापर्यंत घसरेल तर पुढच्या आर्थिक वर्षात हा दर ३ पूर्णांक २ दशांश टक्के राहील, असं जागतिक बँकेनं म्हटलं आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image