कोविडचा ओमायक्रॉन प्रकार युरोपमधून लवकरच संपुष्टात येईल- हान्स क्लूज

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडचा ओमायक्रॉन प्रकार युरोपमधून लवकरच संपुष्टात येईल, असं जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपमधले संचालक हान्स क्लूज यांनी म्हटलं आहे.  सध्या संपूर्ण युरोपमध्ये असलेली ओमायक्रॉनची लाट ओसरली की काही कालावधीसाठी जागतिक पातळीवर रोगप्रतिकारक शक्ती तयार होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

अमेरिकेचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ अँथनी फॉसी यांनी देखील अशीच शक्यता वर्तवली आहे. अमेरिकेत बऱ्याच भागात कोविड १९ ची रुग्णसंख्या कमी होत असली तरी गाफील राहू नये असा इशारा त्यांनी दिला आहे.

ओमायक्रॉनमुळे आलेल्या चौथ्या लाटेनं उच्चांक गाठल्यानंतर प्रथमच आफ्रिकेतला मृत्यूदर कमी होत आहे, असं  डब्ल्यूएचओच्या आफ्रिकेतल्या प्रादेशिक कार्यालयानं सांगितलं आहे.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image