देशात काल कोरोनाचे ५८ हजार ९७ रुग्ण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात  गेल्या चोवीस तासात कोविडचे ५८ हजार ९७ नवे रुग्ण आढळले असून बाधासक्रीय रुग्णांची एकूण संख्या २ लाख १४ हजार झाली आहे. काल १५ हजार ३०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आणि रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के झाला आहे.