मन की बात कार्यक्रमाचा आगामी अंक पुढच्या येत्या ३० जानेवारीला होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमाचा आगामी अंक पुढच्या रविवारी म्हणजेच ३० जानेवारीला होणार असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहून नंतर प्रधानमंत्र्यांचं भाषण होईल. यावेळी मन की बात सकाळी साडेअकराला सुरु होईल. नव्या वर्षातला हा पहिलाच अंक असून एकूण ८५ वा अंक आहे. या कार्यक्रमात गुंफण्यासाठी प्रेरणादायक यशोगाथा पाठवण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी देशवासियांना केलं आहे. MyGov खुल्या मंचावर किंवा नमो अॅपवर संदेश पाठवता येतील. 1800-11-7800 या टोलफ्री क्रमांकावरही हिंदी किंवा इंग्रजीत प्रधानमंत्र्यांसाठी संदेश देता येईल.