वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू राज्य सरकारने केली लॅाकडाऊनची घोषणा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू राज्य सरकारने रविवारपासून पूर्ण लॅाकडाऊनची घोषणा केली आहे. आजपासून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू केली असून दररोज रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत ती लागू असेल. नवीन मार्गदर्शक सूचनांच्या नुसार राज्यातील वाहतूक यंत्रणा, पेट्रोल पंप, एटीएम, वृत्तपत्र आणि दूध वितरण तसंच औषधाची दुकाने मात्र सुरु राहतील. दहावी ते बारावी वगळता सर्व इयत्ताच्या ऑफलाईन शाळा बंद राहतील. सर्व धार्मिक स्थळे शुक्रवार, शनिवार आणि रविवारच्या दिवशी बंद राहतील. राज्य सरकारतर्फे साजरा करण्यात येणारा पोंगल सणाचा उत्सवदेखील स्थगित करण्यात आला आहे. रेल्वेगाड्या ५० टक्के क्षमतेने चालवण्यात येतील.