देशात आतापर्यंत १४५ कोटी ६२ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना मिळाली कोरोना लशीची मात्रा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत १४५ कोटी ६२ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. आज सकाळपासून १४ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. राज्यात काल ८ हजार ५१९ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ३ लाख ४१ हजार ९२२ नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आतापर्यंत १३ कोटी ४० लाख ४० हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात ५ कोटी ३८ लाख २८ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशींच्या दोन्ही मात्रा मिळाल्या असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे. आज सकाळापासून २६ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे.