येत्या १५ वर्षांत कर्करुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी वाढण्याची भीती - अमित शहा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रासायनिक खतांच्या वापरामुळे येत्या १५ वर्षांत कर्करुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी वाढेल, अशी भीती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. गुजरातमधल्या शेतकऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं आवाहन केलं. रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होईल, असं ते म्हणाले. शहा यांनी त्यांच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातल्या ५० टक्के शेतकऱ्यांना रासायनिक खतं सोडून, नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे माती हळूहळू नापीक होत चालली आहे. रसायनांच्या अतिवापरामुळे हे विष पाण्याच्या भूमिगत स्रोतांपर्यंत पोहोचू लागलं आहे. हरित क्रांतीपासून सुरू असलेल्या कृषी पद्धतींचा वेळोवेळी आढावा न घेतल्याचा परिणाम म्हणून सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं ते म्हणाले.