अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी ओमायक्रोन विषाणूचा प्रसार रोखण्यात आपल्या प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप फेटाळला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी ओमायक्रोन विषाणूचा प्रसार रोखण्यात आपल्या प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप फेटाळला आहे. तसंच ओमायक्रॉन विषाणूच्या प्रसाराचा अंदाज कोणालाही वर्तवता आला नसता असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोरोनाच्या उत्परिवर्तित विषाणूंचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता असं बायडन यांचे सल्लागार अँटोनी फौची यांनी म्हटलं आहे. अमेरिकी प्रशासनानं ५०० दशलक्ष नागरिकांची घरोघरी जाऊन कोविड चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. अमेरिकेत सध्या नाताळचा सण साजरा होत असल्यानं कोरोना चाचण्यांचा वेग मंदावला आहे. न्यूयॉर्क शहरात काल कोरोनाच्या २९ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. कोविड महामारीच्या काळातली एका दिवसातली ही सर्वात जास्त रुग्ण संख्या आहे.