१२ निलंबित सदस्यांनी सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्यामुळे त्यांचं निलंबन योग्य : एम व्यंकय्या नायडू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज राज्यसभेचं कामकाज सुरु झाल्यावर, १२ सदस्यांच्या निलंबनावरून विरोधकांनी आजही गदारोळ केला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं होतं. यानंतर राज्यसभेचं कामकाज पुन्हा सुरु झालं आहे. आज कामकाज सुरु झाल्यावर सभापती एम. व्यंकैय्या नायडू यांनी निलंबनाविषयी स्पष्टीकरण देतांना सांगितलं की, या सदस्यांनी सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याबद्दल त्यांना निलंबित केलं आहे, अशा प्रकारच्या अयोग्य वर्तनासाठी निलंबन होण्याची ही पहिलीच वेळ नाही, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही निलंबनाची कारणं सूचीबद्ध केली आहेत. मात्र यादरम्यानच विरोधी पक्षांनी, विरोधी पक्षनेत्याला बोलू देण्याची मागणी करत सभागृहात घोषणाबाजी केली. त्यामुळे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं होतं. 


Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
‘यपटीव्ही’ने आयपीएल २०२१च्या ब्रॉडकास्टिंगचे अधिकार मिळवले
Image
भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला
Image
वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी 'एमजी मोटर इंडिया'चा पुढाकार
Image
'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर 'सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे रविवारी आयोजन
Image