विधानपरिषदेच्या निवडणूकीत चंद्रशेखर बावनकुळे व वसंत खंडेलवाल यांचा विजय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : स्थनिक स्वराज्य संस्थांमधूननिवडूण येणाऱ्या विधान परिषद सदस्यांच्या द्वैवार्षीक निवडणूकींचे निकाल आज जाहीर झाले. नागपूर मतदारसंघातून भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव केला. बावनकुळे यांना ३६२ मतं मिळाली, तर देशमुख यांना १८६ मतं मिळाली. अकोला-बुलडाणा मतदार संघातही भाजपाच्या वसंत खंडेलवालयांनी सेनेचे वर्तमान आमदार गोपिकिशन बजोरिया यांचा पराभव केला. खंडेलवाल यांना ४४३ मतं मिळाली, तर बजोरिया यांना ३३४ मतं मिळाली. एकूण ६ जागांपैकी भाजपानं ४ जागा जिंकल्या आहेत.