विधानपरिषदेच्या निवडणूकांसाठी उद्या मतदान

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघात उद्या मतदान होत आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. नागपूर शहरासह जिल्ह्यात १५ मतदान केंद्र असून एकूण ५६० मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावतील. नागपुरात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे रविंद्र भोयर आणि  अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख यांच्यात लढत आहे. अकोला-बुलढाणा-वाशिममध्ये शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये थेट लढत आहे. सेनेकडून गोपीकिशन बजोरिया आणि भाजपकडून वसंत खंडेलवाल रिंगणात आहेत. यानिवडणुकीसाठी बुधवारीच व्हिप जारी करण्यात आला आहे. महापालिका  आणि नगर परिषदेचे नगरसेवक,  जिल्हा परिषदेचे सदस्य,  पंचायत समितीचे सभापती यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या गटनेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगातर्फे संबंधित संघाचा आढावा घेतला जात आहे. मतदारसंघात निरीक्षक म्हणून दिलीप पांढरपट्टे दाखल झाले असून ते जिल्हाधिकाऱ्यांच्यामार्फत निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवत असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. १४ डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
‘यपटीव्ही’ने आयपीएल २०२१च्या ब्रॉडकास्टिंगचे अधिकार मिळवले
Image
भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला
Image
वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी 'एमजी मोटर इंडिया'चा पुढाकार
Image
'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर 'सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे रविवारी आयोजन
Image