ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची विशेष खबरदारी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने विशेष खबरदारी घेत सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुंबईत सध्या ७० हजार बेड्स तयार असून त्या पैकी १५ हजार बेड्स अॅक्टीव आहेत. गरजेनुसार बेडची संख्या वाढवली जाईल अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र ओमायक्रॉनने महाराष्ट्रातही शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे खबरदारी घेत पालिकेने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पालिकेकडून विमानतळावर आलेल्या सर्व प्रवाश्यांची तपासणी केली जात आहे. रुग्णालये आणि कोविड सेंटरमधील बेड सज्ज ठेवले असल्याचे काकाणी यांनी सांगितलं.