ओमीक्रोन हा नवीन विषाणू आल्यापासून सोलापूर जिल्ह्यात लसीकरणाच्या प्रमाणात वाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड 19 चा नवीन ओमीक्रोन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर काटेकोरपणे अंमलबजावणी प्रत्येक विभागाने करावी. प्रत्येकाचे लसीकरण करून सोलापूर जिल्ह्याच्या लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले. कोविड-19 विषाणूबाबत उपाय योजना संदर्भात आयोजित आढावा बैठकीत पवार बोलत होत्या. कोरोना प्रतिबंधात्मक लसी चा  पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण शंभर टक्के व्हावे यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत यासाठी नागरिकांचे प्रबोधन करावे असं आवाहन त्यांनी केले. ओमीक्रोन हा नवीन विषाणू आल्यापासून जिल्ह्यात लसीकरणाच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. तसंच आजचे लसीकरण 50 हजारापर्यंत गेल्याची माहिती पवार यांनी देऊन आरोग्य विभागाने बाजार समितीच्या मागणीनुसार त्या ठिकाणी लसीकरण करण्याबाबत कॅम्प लावावा अशा ही सूचना पवार यांनी दिल्या.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image