‘दिलखुलास’ कार्यक्रमात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची मुलाखत

  ‘दिलखुलास’ कार्यक्रमात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित – ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या अॅपवर सोमवार दि. १३, मंगळवार दि. १४ आणि बुधवार दि. १५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षातील सामाजिक न्याय विभागाची वाटचाल, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय, बार्टी या संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम, सफाई कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, ग्रामीण व शहरी भागातील गाववाड्यांना समताधिष्ठित नावे देण्याचा निर्णय तसेच ज्येष्ठ नागरिक व तृत्तीयपंथीयांच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय आदी विषयांची सविस्तर माहिती मंत्री श्री. मुंडे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

Popular posts
नगरसेवक नामदेव ढाके यांच्या तहसिल आपल्या दारी मोफत उपक्रमात नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप  
Image
कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
Image
घरीच कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांना चाचणीचे निष्कर्ष संबंधित वेबसाइट आणि स्थानिक प्रशासनाला कळविण्याचं राज्य सरकारचं आवाहन
Image
महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय विविध कार्यालयांना एकाच छताखाली आणण्याचा निर्णय
Image
लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Image