देशातल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांचं प्रमाण ६० टक्क्यावर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पात्र लाभार्थ्यांपैकी ६० टक्के नागरिकांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालं आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी दिली आहे. जनसहभाग आणि आरोग्य सेवकांचं योगदान यामुळे हा टप्पा गाठल्याचं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.