पुण्यात सीएफएसएल प्रयोगशाळेच्या नव्या इमारतीचं अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

 

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुणे इथं सीएफएसएल, अर्थात केंद्रीय न्यायसहायक शास्त्र प्रयोगशाळेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं. शहा यांनी आज पुण्यात श्रीमंत दगडूशेट गणपतीचं दर्शन घेऊन अभिषेक केला. राज्यासह संपूर्ण देश कोरोनामुक्त होवो, आत्मनिर्भर भारताचं ध्येय लवकर पूर्ण होवो आणि अयोध्येत राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो, असं साकडं अमित शाह यांनी गणराया चरणी घातलं. सुजलाम् सुफलाम् भारतासाठी देखील त्यांनी प्रार्थना केली. ते आज पुणे जिल्ह्यातल्या भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.