केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विशेष पथकाकडून राज्याच्या आरोग्य विभागाला लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याचे निर्देश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विशेष पथकानं राज्याच्या आरोग्य विभागाला लसीकरण मोहिमेचा वेग वाढवायचे निर्देश दिले आहेत. राज्याच्या काही भागात ओमायक्रॉनच्या रूगणसंख्येत वाढ होत, असल्याच्या पार्श्वभूमीवर या पथकानं राज्याचा दौरा केला. मुंबई, ठाणे, आणि पुणे परिसरात कोविड १९ तसंच ओमायक्रॉनच्या रूग्णांची वाढ असल्याचं निरीक्षण या पथकानं नोंदवलं. मुंबईची पाहणी केल्यानंतर या पथकानं राज्यातल्या आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत  काल  ठाणे जिल्ह्यातल्या रूग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारांची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी या तीन गावात नव्यानं ओमायक्रॉनचे सात रूग्ण आढळले आहेत. या तिन्ही गावात दिल्या गेलेल्या लसमात्रांची संख्याही कमी आहे.

Popular posts
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताची ऑस्ट्रेलियावर ८२ धावांची आघाडी
Image
मुंबईत लॉकडाऊनच्या दुसरा दिवशी व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण
Image
आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आत्मनिर्भरतेचं अमृत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image
देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव
Image
येत्या तीन वर्षात सुमारे ३६ हजार ५०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं लोकसभेत प्रतिपादन
Image