नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओडिशातल्या चांदीपूर किनाऱ्यावर आज ब्राह्मोस सुपर सोनिक क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीचे सुखोई ३० या सुपरसोनिक लढाऊ विमानाद्वारे सफल परीक्षण करण्यात आलं. हा ब्राह्मोस सुपर सोनिक क्षेपणास्त्राच्या विकासातील महत्वाचा टप्पा आहे. हे क्षेपणास्त्र भारतीय तंत्रज्ञान वापरून देशातच तयार करण्यात आलं आहे. या सफल परीक्षणाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दल आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला शुभेच्छा दिल्या आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.