संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला तामिळनाडूमधल्या कुन्नूर इथं आज दुपारी अपघात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूमध्ये कुन्नूर जवळ आज दुपारी भारतीय वायुदलाचं एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले. या हेलिकॉप्टरमधून संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या सह सेना दलातले वरिष्ठ अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय प्रवास करत होते. जखमींना वेलिंग्टन इथल्या लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताची चौकशी सुरु असल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं.