नरेंद्र मोदी सरकार केवळ सरकार चालवण्याच्या उद्देशानं नाही,तर देशाचा कायापालट करण्याच्या उद्देशानं सत्तेवर - अमित शहा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी सरकार केवळ सरकार चालवण्याच्या उद्देशानं नाही, तर देशाचा कायापालट करण्याच्या उद्देशानं सत्तेवर आलं असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत सुशासन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या समारोप सत्रात बोलत होते. सुशासन म्हणजे सर्वांसाठी, प्रत्येक क्षेत्रासाठी सर्वसमावेशक विकासाची दृष्टी असलेलं पारदर्शक सरकार असल्याचं शहा म्हणाले. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जिंतेंद्र सिंह यांनी यावेळी बोलताना, सरकारची ८० टक्क्यांहून अधिक कामं आता ऑनलाईन झाली असल्याचं सांगितलं. देशाचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात सुशासन दिन साजरा करण्यात येतो.