लहान मुलांवरील अत्याचार आणि सायबर गुन्ह्यांविरोधातली यंत्रणा बळकट केल्याचे केंद्र सरकारचे लोकसभेत निवेदन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल्पवयीन मुलांवरील अत्याचारासह सायबर क्राइमशी संबंधित व्यापक गुन्ह्यांविरोधातली यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारनं, विविध हितसंबंधींशी चर्चा करून उपाययोजना सुरु केल्या आहेत अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. २०१९ या वर्षात अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराशी संबंधित ३०६, तर २०२० या वर्षात १ हजार १०२ सायबर गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी सभागृहाला एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. भारतात इंटरनेट सेवा मुक्त, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उत्तरदायी असावी यासाठीची धोरणं राबवण्याकरता केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी सभागृहाला सांगितलं.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
‘यपटीव्ही’ने आयपीएल २०२१च्या ब्रॉडकास्टिंगचे अधिकार मिळवले
Image
भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला
Image
वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी 'एमजी मोटर इंडिया'चा पुढाकार
Image
'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर 'सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे रविवारी आयोजन
Image