देशातला कोरोनामुक्तीचा दर ९८ पूर्णांक ३८ शतांश टक्क्यांवर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोविड १९ चे ७ हजार ९४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी ४१ लाख ५४ हजारापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातला कोरोनामुक्तीचा दर ९८ पूर्णांक ३८ शतांश टक्के आहे. काल ७ हजार ९७४ नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या देशभरात १ लाख ८७ हजार २४५ एक्टीव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.