भारतानं न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना ३७२ धावांनी जिंकला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये झालेला दुसरा कसोटी क्रिकेट सामना भारतानं ३७२ धावांनी जिंकला. याबरोबरच भारतानं ही दोन सामन्यांची मालिकाही १-० अशी जिंकली आहे. या मालिकेतला पहिला सामना अनिर्णित राहिला होता. आज सामन्याच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडनं कालच्या ५ गडी बाद १४० धावांवरून आपला दुसरा डाव पुढे सुरु केला. मात्र आर अश्विन आणि जयंत यादवच्या फिरकीसमोर, दिवसाच्या पहिल्या सत्रातच अवघ्या ११ षटकं आणि ३ चेंडुंमध्ये न्यूझीलंडचा दुसरा डाव १६७ धावांमध्येच आटोपला. न्यूझीलंडच्या वतीनं डॅरेल मिशेल यानं सर्वाधिक ६० तर हन्री निकोलस यानं ४४ धावा केल्या. भारताच्या आर अश्विन आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी ४ तर अक्षर पटेलनं एक गडी बाद केला. मयांक अगरवाल याला सामनावीर तर रविचंद्रन अश्विन याला मालिकाविराच्या पुरस्कारानं गौरवलं गेलं.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image