कारखान्यांमध्ये सुरक्षा ही वैधानिक गरज – प्रधान सचिव विनिता वेद सिंगल

  कारखान्यांमध्ये सुरक्षा ही वैधानिक गरज – प्रधान सचिव विनिता वेद सिंगल

मुंबई : सामाजिक सुरक्षेबरोबर औद्योगिक सुरक्षा महत्वाची असून यासाठी कामगार विभाग सातत्याने नवनवीन नियम तयार करत आहे. येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय संघटना असो की त्याबाबतचे प्रमाणीकरण असोप्रत्येक रासायनिक किंवा औद्योगिक कारखान्यामध्ये सुरक्षा ही वैधानिक गरज बनली आहे. आज बाजारात रोज नवीन आय.पी.ओ. येत आहे.  मात्र त्यासाठी त्यांना आपला मानक सुरक्षा लेखापरीक्षण अहवाल सादर करावा लागतो. त्यामुळे प्रत्येकाने वैयक्तिक सुरक्षेची काळजी घेतली तर त्यांना संघटनात्मक ध्येय सहज मिळू शकते. एकटा व्यक्ती प्रगती करू शकत नसून त्यांची संघटनेसोबतच प्रगती सहज होऊ शकत असल्याचे प्रतिपादन कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद-सिंगल यांनी आज व्यक्त केली.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय आणि नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील रासायनिक कारखान्यातील ऑपरेटर्सपर्यवेक्षक यांच्याकरिता ॲक्टसेफ-केमसेफ्टी’ या सुरक्षाविषयक शिबिराचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होतेत्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कामगार आयुक्त सुरेश जाधवऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालक सुधाकर राठोड तसेच महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेचे संचालक शशांक साठे आदी उपस्थित होते.

श्रीमती सिंगल म्हणाल्याभविष्यात येणारा काळ आणि त्यानुसार राज्यातील औद्योगिक आणि रासायनिक कारखान्यात काम करणाऱ्या प्रत्येकाने वैयक्तिक सुरक्षेबरोबर कारखान्याची सुरक्षा करणे काळाची गरज बनली आहे. एखादा कारखाना किंवा कंपनी ही आपल्याकडे सुरक्षततेबाबतची किती माहिती आहेयावरून निवड करत असते. यावरून कारखाना कर्मचाऱ्यांनी उत्तम कामगिरीअचूकता आणि  परिणामाभिमुख काम करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत श्रीमती सिंगल यांनी व्यक्त केले.

कामगार आयुक्त श्री.जाधव म्हणाले कीराज्यातील कामगारांचे हित जपण्यासाठी जवळपास 29 कायदे करण्यात आले असून रासायनिक तसेच औद्योगिक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शासन काळजी घेत असते. पूर्वीचा काम करणारा कामगार हा एका कंपनीमध्ये आयुष्यभर काम करत असे. पण आता जग स्पर्धात्मक झाले असल्याने आपल्याकडे सुरक्षेविषयक असलेल्या ज्ञानावर कारखान्यात निवड केली जात आहे. औद्योगिक तसेच रासायनिक कारखान्यात सुरक्षाविषयक प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांची निवड करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे या सुरक्षा प्रशिक्षणाचा उपयोग सर्वांना होणार असल्याची गरजही श्री.जाधव यांनी व्यक्त केली.

संचालक श्री.राठोड म्हणाले कीकारखान्यात होणारे 80 टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे होत असतात. औद्योगिक आणि रासायनिक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना सुरक्षाविषयक प्रशिक्षणाचा नेहमीच फायदा होत आहे. गेल्या तीन वर्षापासून शासनस्तरावर हे प्रशिक्षण शिबिर राबविण्यात येत असून यामुळे अपघात टाळण्यासाठी ॲक्टसेफ-केमसेफ्टी’ या प्रशिक्षणाचा निश्चितच फायदा होणार असल्याचे श्री.राठोड यांनी यावेळी सांगितले.