देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 142 कोटी 38 लाख मात्रांचा टप्पा केला पार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 142 कोटी 38 लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे. यात 83 कोटी 80 लाखाहून जास्त पहिल्या मात्रा तर 58 कोटी 58 लाखांहून जास्त दुसऱ्या मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात लसींच्या 65 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.