दोन नव्या संघांसह पुढच्यावर्षीची IPL भारतातच आयोजित करण्याची BCCI ची घोषणा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडिअन प्रिमीअर लिग अर्थात आयपीएलचं २०२२ चे पर्व भारतातच आयोजित केलं जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली. आयपीएलचं यंदाचं विजेतेपद मिळवल्यानिमीत्त काल चेन्नई इथं आयोजित एका सोहळ्यात ते बोलत होते. या पर्वात दोन नव्या संघांचा समावेश होणार असल्याचंही जय शाह यांनी स्पष्ट केलं.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २०२० या वर्षात आयपीएलची संपूर्ण स्पर्धा, तर २०२१ च्या स्पर्धेचं दूसरं सत्र दुबईत आयोजित केलं गेलं होतं.