कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण वाढविण्यासाठी ‘हर घर दस्तक’ अभियान ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज ओमायक्रोन या कोविडच्या उत्परिवर्तित विषाणूबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सर्व  राज्यांची बैठक घेतली. ओमायक्रोन हा विषाणू RT-PCR आणि  RAT चाचणीमधून निसटत नसल्याचं स्पष्ट झालं असून शंभर टक्के नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्याचं लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकारचा ‘हर घर दस्तक’ कार्यक्रम येत्या ३१ डिसेम्बर पर्यंत सुरु राहील असं ते म्हणाले. नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्याचं काम देखील सुरूच राहणार असून कोरोना संसर्गाचं लवकर निदान आणि योग्य व्यवस्थापन करण्यासाठी  सर्व राज्यांनी चाचण्यांचं प्रमाण वाढवावं असे निर्देश त्यांनी दिले.