राष्ट्रपतींच्या हस्ते नामदेवराव चंद्रभान कांबळे यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते वाशिम इथले साहित्यिक नामदेवराव चंद्रभान कांबळे यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. शिक्षक, पत्रकार आणि एक प्रसिद्ध मराठी लेखक असलेल्या कांबळे यांनी कथा, कविता आणि गंभीर तात्विक लेखन सुद्धा केलं आहे. नामदेव कांबळे यांच्या आठ कादंबऱ्या, चार कवितासंग्रह, दोन कथासंग्रह आणि दोन ललित संग्रहांखेरीज चरित्र, वैचारिक ग्रंथ अशी त्यांची एकवीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत.