टी- टेन्टीं विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारताचा नामिबीयावर ९ गडी राखून विजय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं नामिबीयाला ९ गडी राखून हरवलं. नामिबीयानं भारताला १३३ धावांचं लक्ष दिलं होतं, ते भारतानं सोळाव्या षटकात पूर्ण केलं. उद्या इंग्लंड आणि न्यु झीलंड यांच्यात उपांत्य फेरिचा पहिला सामना दुबई इथं होणार आहे. आणि परवा म्हणजेच गुरवारी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरितला दुसरा सामना होईल. आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवर या सर्व सामन्यांचं धावतं समालोचन ऐकता येईल.