देशात काल बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांची संख्या जास्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल कोविड १९ चे ९ हजार ८६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी ३९ लाख ७७ हजारापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ३३ शतांश टक्के झाला आहे. काल १० हजार ५४९ नवे रुग्ण आढळले. सध्या देशभरात १ लाख १० हजार १३३ एक्टीव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत बाधीत झालेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ३२ शतांश टक्के आहे.