मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वाभूमीवर गेल्यावर्षी रद्द करावी लागलेली, हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धा यावर्षी डिसेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयमार्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध केंद्रांबरोबरच राज्याबाहेरील संघांसाठी एक आणि देशाबाहेरील संघांसाठी एक अशी दोन नवीन ऑनलाइन केंद्रं सुरू करण्यात येतील, असंही त्यांनी काल स्पष्ट केलं. राज्याच्या हीरक महोत्सवी आणि देशाच्या अमृत महोत्सवी तसंच स्पर्धेच्या हीरक महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून स्पर्धेची व्याप्ती अधिक वाढवण्यात येत आहे. त्यामुळे राज्याबाहेरील आणि देशाबाहेरील मराठी रंगकर्मींना या स्पर्धेचा लाभ घेता येईल तसेच मराठी रंगभूमी अधिक समृद्ध होईल,असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला. कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करून, प्रयोग सादर करावेत असं आवाहन त्यांनी केलं. दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही लवकरच घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.