राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या सुमारे ७ हजार जागांसाठी निवडणूक प्रक्रीया जाहीर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ७ हजार १३० रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ डिसेंबरला मतमोजणी होईल,अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली काल दिली. या निवडणुकीसाठी ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. ७ डिसेंबर रोजी पडताळणी होईल, तर ९ डिसेंबर पर्यंत अर्ज मागे घेतले जातील. राज्यभरात ११३ नगरपंचायतींमधल्या सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर २६ नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२१ रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील असंही यू.पी.एस.मदान यांनी सांगितलं. 

 

 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image