अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध- देवेंद्र फडनवीस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असून याबाबतचे पुरावे आपण दिवाळीनंतर जाहीर करू असं  विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. फडनवीस यांनी राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्या आरोपाचं त्यांनी यावेळी खंडन केलं. मलिक यांनी ट्विट केलेल्या फोटोतल्या व्यक्तीशी आपला कुठलाही संबंध नसून त्यातून मलिक यांची मानसिकता समजून घेतली पाहिजे असं ते म्हणाले. मलिक यांच्या जावयाकडे अंमली पदार्थांचा साठा सापडला. त्यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसला ड्रग्ज माफिया म्हणायचं का, असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध कसे आहेत, याचे पुरावे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख शरद पवार यांना देणार आहोत, तसंच मलिक यांनी सुरु केलेल्या या प्रकरणाला आपण शेवटापर्यंत नेणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.