राज्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा १० कोटींचा टप्पा पार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणानं काल दहा कोटींचा टप्पा पार केला. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल ही माहिती  दिली. राज्यात लशीची पहिली मात्रा ६ कोटी ८० लाख ५३ हजार ७७ तर दुसरी मात्रा ३ कोटी २० लाख ७४ हजार ५०४ मात्रा देण्यात आल्या आहेत. एकूण १० कोटी १ लाख २७ हजार ५८१ लशींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत, असं टोपे यांनी सांगितलं. या यशात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व स्तरावरील अधिकारी-कर्मचारी यांच्याबरोबरच लसीकरण मोहिमेत योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे, असंही टोपे म्हणाले.