दुबईतल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात 15 हजार कोटीपेक्षा अधिक रकमेच्या सामंजस्य करार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुबईतल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत राज्यानं 25 सामंजस्य करार केले असून त्यामुळे राज्यात 15 हजार 260 कोटी रूपयांची गुंतवणूक होणार आहे. तर 10 हजारांपेक्षा जास्त प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हे करार करण्यात आले. यामध्ये जपान, सिंगापूर, स्वीडन, कोरिया, जर्मनी, इटली या देशातल्या तसंच आपल्या देशातल्या कंपन्यांनी वाहन आणि वाहन घटक, प्राणवायू उत्पादन, वस्त्रोद्योग, डाटा सेंटर, औषध निर्माण, आदी क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. आर्थिक आणि औद्योगिक सहकार्यासाठी देखील आफ्रिका-भारत आर्थिक प्रतिष्ठानसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.