माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांच्याकडून अॅनिमेशन, VFX, गेमिंग उद्योगातल्या महत्त्वाच्या व्यक्तींशी मुंबईत चर्चा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्र यांनी आज मुंबईतल्या काही महत्त्वाच्या स्टुडिओला भेट दिली. तसेच अॅनिमेशन, VFX, गेमिंग उद्योगातल्या व्यक्तींशी चर्चा केली. फायर स्कोर इंटरॅक्टिव्ह डेव्हलपमेंट स्टुडिओ या संगणकीय खेळ विकसित करणाऱ्या कंपनीला भेट दिली. भविष्यकाळात भारतातील संगणक खेळ उद्योगातील उलाढाल अब्जावधी डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या उद्योगातील नवीन कल समजून घेण्यासाठी तसंच आघाडीच्या कंपन्यांशी चर्चा करण्यासाठी अपूर्व चंद्र यांनी ही भेट घेतली आहे. क्रेझी लॅब स्टुडिओ या आघाडीच्या मोबाईल गेम डेव्हलपर कंपनीने फायर स्कोर इंटरॅक्टिव्ह हा मुंबईतला यशस्वी हायपर कॅज्युअल गेम डेव्हलपमेंट स्टुडिओ खरेदी करण्याचं मान्य केलं आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image