राज्य वन्यजीव कृती आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी व्यापक उपाययोजना सुचवणाऱ्या राज्य वन्यजीव कृती आराखड्याला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या १७ व्या बैठकीत काल हा आराखडा मंजूर करण्यात आला. हा कृती आराखडा २०२१ ते २०३० असा  दहा वर्षांसाठी तयार केला  असून असा आराखडा तयार करणारं  महाराष्ट्र हे देशातलं  पहिलं  राज्य ठरलं  आहे. या आराखड्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. चंद्रपूर जिल्ह्यातल्या मानव व्याघ्र संघर्षावर  अभ्यासगटानं   सादर केलेल्या अहवालातल्या  शिफारशींवर  बैठकीत  चर्चा झाली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या अंधारी अभयारण्य क्षेत्राचं  विस्तारीकरण करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.