योग्य त्या सुरक्षा तपासण्या करूनच चित्रपटगृहं सुरू करायचे मुख्यमंत्र्यांची सूचना

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक अशा योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहं सुरू करावीत, असं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहं सुरू होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर सिनेमा ओनर्स एन्ड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहांना कसा दिलासा देता येईल, यासाठी योग्य तो तोडगा वित्त विभागाच्या समन्वयानं काढला जाईल, असं ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. विविध परवान्यांच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनानं सवलत द्यावी, तसंच सिनेमा लायसेन्सचं विनामूल्य नूतनीकरण करून द्यावं, जीएसटी भरल्यानंतर प्रत्येक तिकीर्टामागं २५ रुपये सर्व्हिस चार्जेस आकारायला परवानगी द्यावी, विद्युत वापर नसल्यानं देयकं मिनिमम वापरावर आधारित असू नयेत, मिळकत कर आकारू नये, अशा मागण्या असोसिएशननं यावेळी सादर केल्या.

 

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image