राज्य सीईटी परीक्षेचा आज निकाल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल आज संध्याकाळी ७ वाजेनंतर जाहीर केला जाणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवर आज ही घोषणा केली. mhtcet२०२१.mahacet.org या वेबसाइटवर लॉगिन करुन विद्यार्थ्यांना MHT-CET-२०२१ परीक्षेचा हा निकाल पाहता येईल.