आशियाई विकास बँकेने केंद्रसरकारला दिलं १० कोटी अमेरिकन डॉलर्सचं कर्ज

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या कृषी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासाकरता आशियाई विकास बँकेने केंद्रसरकारला १० कोटी अमेरिकन डॉलर्सचं कर्ज दिलं आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं आणि अन्नाची नासाडी होऊ नये याकरता कापणीपूर्वी आणि नंतर साठवण – प्रक्रीयेसाठी आवश्यक सोयीसुविधा उभारणं, विक्रीसाठी संपर्क जाळं मजबूत करणं, या कामासाठी हे कर्ज वापरलं जाणार आहे. केंद्रीय अर्थविभागाचे अतिरिक्त सचिव रजतकुमार मिश्रा आणि आशियाई विकास बँकेचे भारतातले प्रतिनिधी ताकेओ कोनिशी यांनी काल यासंदर्भातल्या समझोत्यावर स्वाक्षऱ्या केल्या.