मुंबईतल्या कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो-३ मार्गाचं ९७ टक्के भुयारीकरण आणि ७० टक्के स्थापत्त्य काम पूर्ण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : 'तात्पुरती सेवा उभारण्यासाठी राज्य शासनानं दिलेल्या परवानगीमुळे  प्रकल्पाला  चालना मिळणार आहे तसंच पहिल्या नमुना ट्रेनच्या चाचणीला  सुरुवात करून आपण  आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठणार असल्याचं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी म्हटलं आहे. या तात्पुरत्या सेवा उभारण्याचं काम अडीच महिन्यात पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं.