भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळेच केंद्रात तसंच अनेक राज्यांमध्ये भाजपाला सेवेची संधी मिळाली- प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळेच केंद्रात तसंच अनेक राज्यांमध्ये भाजपाला सेवेची संधी मिळाली, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पक्षाच्या आणि देशाच्या उभारणीसाठी भाजपा कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्यानी स्वःतच आयुष्य वाहून घेतलं, असं ट्विट त्यांनी केलं आहे. नमो अॅपमध्ये कमल पुष्प हा अतिशय चांगला विभाग आहे. पक्षाची विचारधारा लोकप्रिय करणाऱ्या प्रेरणादायी कार्यकर्त्यांची माहिती त्यात मिळू शकेल. लोकांनी त्यात योगदान देऊन हा विभाग अधिक समृद्ध कराव, असं आवाहन मोदी यांनी केलं.