महाराष्ट्रात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ५४ शतांश टक्क्यावर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाच्या १९ हजारापेक्षा कमी रुग्णांवर उपचार सुरू, ७ जिल्ह्यांमध्ये १० पेक्षा कमी रुग्ण उपचाराधीन महाराष्ट्रात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ५४ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल २ हजार ११२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, १ हजार ४१८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ३६ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातला मृत्युदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ६६ लाख ७ हजार ९५४ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६४ लाख ४५ हजार ४५४ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ४० हजार १३४ रुग्ण दगावले. सध्या राज्यभरात एकूण १८ हजार ७४८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. नंदुरबार जिल्ह्यात सध्या एकही रुग्ण उपचाराधीन नाही. तर, धुळे, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या सात जिल्ह्यांमधे एक्टीव्ह रुग्णांची संख्या एक आकडी आहे.