राज्यातील चंदन उत्पादन वाढीला उत्तेजन देण्यासाठी सरकार कटीबद्ध

 

मुंबई (वृत्तसंस्था) : चंदन लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अगरबत्ती उद्योगाला चालना देण्याकरिता शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन राज्याचे वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं आहे. राज्यातील चंदन उत्पादन वाढीला उत्तेजन देण्यासाठी भरणे यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं. चंदन भुकटी, तेल तसंच चंदनाच्या काड्या यांना मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे. अगरबत्तीच्या व्यवसायात चंदनाचा समावेश कशा प्रकारे करता येईल, याची पाहणी वनविभागानं करावी, असंही भरणे यांनी सांगितलं.