कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ८० कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ८० कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. काल ८५ लाख ४२ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची संख्या ८० कोटी ४३ लाखाच्या वर गेली आहे. देशात काल कोविड-१९ चे ३८ हजार ९४५ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ३ कोटी २६ लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के झाला  आहे. काल ३० हजार ७७३ नवे रुग्ण आढळले. सध्या देशभरात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सुमारे ३ लाख ३२ हजार आहे.  

Popular posts
रमजान महिन्यात नमाजासाठी एकत्र जमण्याची परवानगी देता येणार नाही- उच्च न्यायालय
Image
तलिबान सत्तेत आल्यानंनतर अफगाणिस्तानमध्ये ६४००हून अधिक माध्यम प्रतिनिधींनी गमवली नोकरी
Image
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भावेश शेखावत यांनी २५ मिटर रॅपिड फायर पिस्तोल प्रकारात पटकावलं सुर्वण पदक
Image
भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Image
येत्या सोमवारपासून ७१ अनारक्षित मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय
Image