कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बेनामी व्यवहार केल्याचा किरिट सोमय्या यांचा आराेप

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुबिंयानी १२७ कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार केले असल्याचा आऱोप भाजपानेते किरिट सोमय्या यांनी केला आहे. हे गैरव्यवहार शेल आणि बोगस कंपन्यामार्फत केले आहेत, असं सोमय्या यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. याबाबतचे  पुरावे आयकर विभागाकडे दिले असून, आपण ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाकडेही  तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, सोमय्या यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन असल्याचं सांगत हसन मुश्रीफ यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या घरावर आयकर विभागानं छापे टाकले, मात्र त्यात काहीही आढळलं नाही, असं मुश्रीफ यांनी बातमीदारांना सांगितलं. सोमय्या यांच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचंही ते म्हणाले.