सी आय एस एफ ची सायकल रॅली नाशिकहून चांदवडला रवाना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सी आय एस एफ, अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची येरवडा ते दिल्ली राजघाट सायकल रॅली आज नाशिकहून चांदवडला रवाना झाली. नाशिकच्या सहाय्यक जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. कोरोना नियमांचं पालन करत हा कार्यक्रम झाला. या रॅलीचा आजचा मुक्काम चांदवड इथं असणार आहे. या कार्यक्रमाला डेप्युटी कमांडंट कृतिका नेगी, डेप्युटी कमांडंट राघवेंद्र सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.