साताऱ्यात फीट इंडिया फ्रीडम रनचं आयोजन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आजादी का अमृतमहोत्सव" कार्यक्रमाअंतर्गत साताऱ्यात नेहरु युवा केंद्र, एनएसएस आणि शिवाजी विद्यपीठ यांच्या संयुक्त विद्यमानं फीट इंडिया फ्रीडम रनचं आज सकाळी सातारा इथल्या छत्रपती शाहू क्रिडा संकूल ते यशंवतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पर्यंत आयोजन केलं होतं. रोज अर्धा तास व्यायामासाठी आपल्या निरोगी आरोग्यासाठी हा संदेश या रनमधून दिला गेला. अशा उपक्रमांमधल्या सहभागामुळे देशाच्या सक्षमीकरणात मोठी मदत होईल, असं मत आयोजकांनी व्यक्त केलं. या रन मधे युवक वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image